आंध्र महाराष्ट्राच्या सीमेपासून २० कि.मी. अंतरावर व पांढरकवडा या तालुक्याच्या ठीकाणापासून केवळ ४ कि.मी. अंतरावर राष्ट्रीय महामार्ग ७ या महत्वाच्या हैदराबाद - नागपूर रस्त्यावर केळापूर या छोटेखानी गावी मॉ जगदंबेचे अति प्राचीन हेमाडपंथी प्राचीन मंदीर आहे. ही जगदंबा अतिशय जागृत असून आंध्र प्रदेश व विदर्भातील दूरवरुन भाविक मोठ्या संखेने येथे दरवर्षी येत असतात. तरी वर्षानुवर्षे हे मंदिर उपेक्षीत होते.
१९८८ मध्ये श्री जगदंबा संस्थान केळापूर पब्लिक ट्रस्ट म्हणून घोषीत करण्यात आले व संस्थान्चे परीसरांत अनेक सावलीच्या व शोभिवंत फुलझाडांची लागवड करून मंदीर परिसराचे सौंदर्य वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. दुरवरून येणार्या भाविकांसाठी भक्त निवास / मंगलकार्यालय, मुलांसाठी बाल उद्यान आदिंच्या सोयी केल्या आहेत.
२ ऑक्टो १९८२ रोजी म. शिवाजीराव मोघे उपमंत्री म. रा. यांचे शुभहस्ते, श्री. अण्णासाहेब पारवेकर यांचे अध्यक्षतेखाली, श्री. संत ईस्तारी महाराज (किन्ही) यांचे प्रमुख उपस्थितीत व घाटंजी, पांढरकवडा य दोन्ही तालुक्यातील अनेक भाविक नागरिकांचे उपस्थितीत मॉं. जगदंबेच्या प्रेरणेने मंदीराचे जीर्णोध्दाराच्या भूमीपूजनाचा सोहळा थाटात पार पडला. १९८२ ते १९८७ पर्यंत एकता मंडळ जीर्णोध्दार समीतीच्या वतीने भाविकांकडून सार्वजनिक रुपात वर्गणी गोळा करुन जीर्णोध्दाराचे कार्य करण्यात आले. समीतीने या कामावर साडे चार लक्ष रु. खर्च केला